महाआघाडीत नाराजी ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई - आघाडी सरकारमध्ये अधिकार आणि विविध प्रकारच्या घेण्यात येत असलेल्या निर्णयावरून सुरू असलेले अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. 
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि विविध शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारात घेण्यात आले नसल्याने दोन्ही पक्षात नाराजी व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनपेक्षा इतर पर्यायांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला नाही, यामुळे आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येणार असल्याने त्यासाठी आज पवारांनी तातडीने मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली.
दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेसच्या मंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत डावललेले जात असल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात हेाती. मात्र, आता यात राष्ट्रवादीचीही भर पडली आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची कामे होत नसल्याने याविषयीची खदखद काही मंत्र्यांनी शरद पवार यांच्याच कानावर टाकल्याने त्याविषयीही पवारांनी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येते.
विधानपरिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागेपैकी चार जागा हव्यात, यासाठी मागील काही दिवसांत काँग्रेसमध्ये नाराजी होती. तर मागील दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त्‍ केली होती. तसेच राज्यात कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी न्याय योजना लागू करावी, आणि गरीबांच्या खात्यात थेट रक्कम टाकावी अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून अजूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने काँगेसची नाराजी अधिक वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे सांगण्यात येते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget