भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा - उदय सामंत

मुंबई - विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा निर्णय अजूनही निकाली लागलेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका मांडली जात आहे. याच भूमिकेवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केरळमधील घटनेचा संदर्भ देत “केंद्र सरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,” असे आवाहन यांनी केले आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट केल आहे. केरळमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहीजणांना करोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताचा हवाला देत सामंत यांनी हे ट्विट केले आहे. “आता केंद्र सरकार अजून कसली वाट बघत आहे. कर्नाटक (परीक्षा केरळ सरकारने घेतली आहे. ट्विटमध्ये चुकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.) सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली असे पुढे आले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget