चलनातून बाद झालेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या नोटा जप्त

औरंंगाबाद - भारतीय चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपये किमतीच्या जवळपास एक कोटी रुपयांच्या नोटा गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई बुधवारी मोंढा नाका चौकातील सिंधी कॉलनी येथे असलेल्या हॉटेल ग्लोबल इन येथे करण्यात आली. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह चार जणांना अटक केली. प्रियंका सुभाष छाजेड (वय ३०, रा.कामगार कॉलनी, चिकलठाणा), नम्रता योगेश उघडे (वय ४०, रा.जबिंदा इस्टेट, बीड बायपास), मुश्ताक पठाण जमशिद पठाण (वय ५३, रा.टाईम्स कॉलनी, कटकटगेट), हाशीम खान बशीर खान (वय ४४, रा.लक्ष्मण चावडी) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ साली भारतीय चलनातून बाद झालेल्या १ हजार आणि पाचशे रूपये किमतीच्या नोटा बदलून देण्यासाठी दोन जण सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेल ग्लोबल इन येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, सहाय्यक फौजदार नितीन मोरे, जमादार भगवान शिलोटे, विलास वाघ, प्रभाकर म्हस्के, विशाल पाटील, आनंद वाहुळ, नितीन देशमुख, विरेश बने, संदीप सानप, प्रभाकर राऊत, अश्वलींग होनराव, परवेज पठाण, गजानन डुकरे, संजीवनी शिंदे, आशा कुटे, ज्ञानेश्वर पवार आदींच्या पथकाने हॉटेल ग्लोबल इनच्या पहिल्या मजल्यावर छापा मारून चौघांना ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी चौघांच्या ताब्यातून भारतीय चलनातून बाद करण्यात आलेल्या १ हजार आणि ५०० रूपये किमतीच्या जवळपास ९८ लाख ९२ हजार ५०० रूपये किमतीच्या नोटा आणि चार मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget