नेपाळी नागरिकांनी नो मेन्स लँडवरील खांब उखडला

बेतिया  - नेपाळने पुन्हा एकदा सिमावर्ती भागातील सीता गुहेजवळील खांब उखडला असून भारतीय भूमीवर आपला दावा केला आहे. स्थानिक लोकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच भिखनाठोरी येथील एसएसबी ४४ वी बटालियन आणि पीओपी जवानांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला.पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या श्री राम संदर्भातील विधानाचे नेपाळी नागरिकांनीही समर्थन करण्यास सुरवात केली आहे. नेपाळी नागरिकांनी भारत-नेपाळ सीमेवरील भगवान राम यांच्याशी संबंधित असलेल्या जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू लागला आहे. नेपाळी लोकांनी पश्चिम चंपारणच्या भिखनाठोरीमधील नो मेन्स लँडवरील सीता लेणी जवळील ४३६ नंबरचा खांब उखडून टाकला आहे.घटनेनंतर बीओपीमध्ये तैनात असलेले निरीक्षक प्रीतम कुमार जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर सहाय्यक जनरल शैलेश कुमार सिंह यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. घटनेपूर्वी नेपाळस्थित ठोरीमध्ये परसा जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी परिसराचा दौरा केला होता. त्यानंतर नेपाळी पोलिसांच्या उपस्थितीत नेपाळी नागरिकांनी खांब उखडून टाकला. त्याच बरोबर, नेपाळी नागरिक येत्या दोन दिवसांत सीता गुहेत पूजा करण्याची तयारी करत आहेत, असे एसएसबीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.सीता माता या गुहेत काही दिवस राहिली होती. या ठिकाणाहूनच ती वाल्मिकी आश्रमात गेली होती. दरम्यान पंडई नदीच्या मध्यभागी डोंगरावर वसलेल्या या सीता लेणीत दोन्ही देशांचे लोक पूजा करत होते. मात्र, नेपाळी पंतप्रधानांच्या विधानानंतर, सीमावर्ती भागात भगवान राम आणि सीतेशी संबंधित असलेल्या धार्मिक स्थळी नेपाळी नागरिकांनी त्यांचा अधिकार सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दरम्यान नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे सत्ता वाचवण्यासाठी सतत भारतावर आरोप करत आहेत. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करत नकली अयोध्या निर्माण केली. पण खरी अयोध्या ही नेपाळमध्ये आहे, असा दावा ओली यांनी केला. नेपाळमधील नेत्यांनी पंतप्रधानांच्या विधानाची थट्टा उडवल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाकडून सारवासारव करण्यात आली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget