भारतीय रेल्वने चिनी कंपनीचे कंत्राट केले रद्द ; चिनी कंपनीची कोर्टात धाव

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आले होते. तर भारताने देखील चीनच्या ४० जवानांना ठार केले होते. त्यानंतर देशभरातून चीनचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. याच पार्श्वभूमीवर अनेक भारतीय कंपन्यांनी चीनसोबत व्यवहार करण्याचे टाळण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता भारतीय रेल्वेनेदेखील चीनला झटका देत चिनी कंपनीला कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कानपूर आणि मुगलसराय दरम्यान इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर संबंधीत चायनीज कंपनीचा करार रद्द केला. सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर चीनच्या वस्तूंवर विविध स्तरांतून केल्या गेलेल्या बहिष्काराच्या इतर घटनांमुळे चीनचा तीळपापड झाला आहे. यानंतर चिनी कंपनीने भारतीय रेल्वेविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.कामाचा वेग कमी असल्याचे कारण देत भारतीय रेल्वेने चिनी कंपनीला दिलेलं ४७१ कोटी रूपयांचं कंत्राट रद्द केले. फ्रेट कॉरिडोअरच्या सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला दिलेला कंत्राट शुक्रवारी रेल्वेने रद्द केले. कानपूर ते मुगलसराय दरम्यानच्या कॉरिडॉरच्या ४१७ किलोमीटर लांबीच्या मार्गावर हे काम होणार होते. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे (डीएफसीसीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्याची माहिती दिली.

डीएफसीसीआयएल ही या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी एक संस्था आहे. “बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाइन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन ग्रुपला १४ दिवसांची नोटीस दिल्यानंतर हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र जारी करण्यात आले. याच समुहाला २०१६ मध्ये ४७१ कोटी रुपयांचे हे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार, कंपनीला २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. परंतु, आत्तापर्यंत चिनी कंपनीने केवळ २० टक्के काम पूर्ण केल्याचे रेल्वेचे  म्हणणे आहे. याच आधारावर भारतीय रेल्वेने चिनी कंपनीचा करार रद्द केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget