कोरोनाचा कहर ; यंदाची अमरनाथ यात्रा रद्द

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा २१ जुलैपासून सुरु होणार होती.
याआधी जूनमध्ये श्राइन बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर २१ जुलैपासून यात्रा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेसाठी याठिकाणी कोविड रुग्णालय देखील उभारण्यात आले होते. स्थानिक लोकांनी यात्रेबाबत चिंता व्यक्त केली होती. यात्रेला आलेल्या श्रद्धाळूंवर येथे क्वारंटाईन होण्याची वेळ येऊ नये. असे स्थानिकांचे मत होते.
अमरनाथ तीर्थक्षेत्र समुद्रसपाटीपासून १३,६०० फुट उंचीवर हे तीर्थक्षेत्र आहे. अमरनाथ गुहा ही भगवान शिव यांच्या काही प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणी भगवान शिव यांनी माता पार्वती यांना अमरत्वचे रहस्य सांगितले होते. असे म्हटले जाते. या पवित्र गुहेत प्राकृतिक शिवलिंग निर्मिती होते. याला स्वयंभू हिम शिवलिंग देखील म्हटले जाते. आषाढ पोर्णिमेला ही यात्रा सुरु होते तर रक्षाबंधनपर्यंत संपूर्ण श्रावण महिना या ठिकाणी या पवित्र हिमलिंग दर्शनासाठी लाखो लोकं येत असतात.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget