मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश

मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबईत हे कलम लागू करण्यात येणार असून, परिणामी शहरामध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.१५ जुलै रात्रौ १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. यारम्यान पहाटे ५ ते रात्री ९ वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. 
पीआरओ प्रणय अशोक यांनी याबाबतचे आदेश जारी केले. ज्याअंतर्गत एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव घालण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इतरही कोणत्याच ठिकाणी व्यक्तींना एकत्र न जमण्याचे आदेश या कलमाअंतर्गत देण्यात आले आहेत. काहीसा नियंत्रणात आललेला कोरोना रुग्णांचा आकडा नागरिकांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे नाईलाजानं संचारबंदीचे आदेश पुन्हा देण्यात आले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget