...तर मराठा आंदोलन करावं लागेल ; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

नाशिक - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि काळजी घेण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या सरकारच्या काळात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालये सरकारने ताब्यात घ्यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली. सरकारने चाचण्या कमी केल्या, रुग्ण संख्या कमी दाखविण्याकडे जास्त लक्ष दिल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबाबत या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा थेट आरोप मेटे यांनी यावेळी केला. त्या कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण व्हायला लागले आहे, असे ते म्हणाले.अण्णासाहेब पाटील मंडळाकडे हे सरकार आल्यापासून मोठे दुर्लक्ष झाले आहे. एक पैसा सुद्धा कुणाला दिलेला नाही. आम्ही मागणी आहे की, २५ हजार देण्याची सरकारला विनंती आहे. मात्र, लक्षच दिले जात नाही. सरकारने मोठा मार्ग बंद केला आहे, असे विनायक मेटे यावेळी म्हणाले. 
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संभ्रम होत आहे. याच महिन्यात सुनावणी होणार आहे. त्याबाबत काही हालचाल होताना दिसत नाही. केवळ मेडिकल प्रवेशाच्या बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मूळ याचिकेवर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे घेणे अशक्य आहे. मेडिकल प्रवेशाबाबतच सुनावणी घ्यायला पाहिजे, अशी राज्य सरकारला विनंती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. मराठा समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष केले, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.
मराठा आंदोलनात अनेकांवर केसेस झाल्या त्याबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक केसेस तशाच पडून आहेत. ज्यांचं बलिदान दिले त्यासाठी तत्कालीन मदत करण्याची घोषणा केली. मात्र त्याबद्दल हे सरकार काहीच करत नाही. तर कोपर्डीच्या बहिणीला न्याय अजून मिळालेला नाही. मराठा समाजाच्या विरोधात हे सरकार असल्याचे वाटत आहे.या सरकारमधील मराठे नेते २०१४ च्या आधी चुका करत होते ते आता सहा महिन्यांत सुरु झाल्या आहे, असे विनायक मेटे म्हणाले.
मी बोललो त्याकडे सरकारने गांभीर्याने देणे गरजेचे आहे. त्यांनी लक्षात घेऊन काहीच पाऊले उचलली नाही तर आंदोलन करावे लागेल, असा इशारा विनायक मेटे यांनी यावेळी दिला. मग मराठा समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget