महापालिकेचा भोंगळ कारभार ; व्यावसायिकाला पॉझिटिव्ह म्हणून केले दाखल रिपोर्ट आला निगेटिव्ह

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात कोविड तपासणी झाल्यावर पॉझिटिव्ह असल्याचे सांगत व्यावसायिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनाच रात्री निगेटिव्ह असल्याचा मेसेज आला. निगेटिव्ह असताना मग पॉझिटिव्ह रुग्णांजवळ का ठेवले? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला.या गोंधळानंतर राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. महानगरपालिकेच्या ज्या लोकांकडून निष्काळजीपणा झाला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केली. बाधित रुग्णांसोबत ठेवल्याने या व्यावसायिकांनादेखील बाधा झाल्याचा आरोप खांबेकर यांनी केला. तसेच मनपाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला.शहरात १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्युचे पालन करण्यात आले. त्यांनतर बाजारपेठ उघडताना व्यावसायिकांना कोविडची रॅपिड चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. या निर्णयामुळे मनपा विरोधात असंतोष व्यक्त केला जात असताना केलेल्या चाचण्या विश्वासार्ह आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे सांगत काही व्यावसायिकांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच व्यावसायिकांना अचानक चाचणी निगेटिव्ह असल्याचा मेसेज आला. त्यामध्ये आपली कोरोना चाचणी झाली असून अहवाल निगेटिव्ह आहे. यापुढे कोरोना होणार नाही याबाबत काळजी घ्या, असे या मेसेजमध्ये देण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांनी संतप्त भावना व्यक्त करत घरी सोडण्याची मागणी केली. त्यामुळे कोविड सेंटर येथील डॉक्टरांसोबत अनेकांचे वाद झाले. सिपेट, नवखंडा आणि मेलट्रॉन येथे दाखल व्यावसायिकांना हे मेसेज मिळाले असल्याने या कोविड केंद्रावर रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. गोंधळ झाल्याचे समजताच काही व्यावसायिकांना नवे मेसेज प्राप्त झाले, ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे झालेल्या चाचण्यांवर विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अनेक व्यावसायिकांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याकडे याबाबत तक्रारी दिल्या असून चूक करणाऱ्या मनपाच्या पथकातील लोकांवर कारवाई करण्याची मागणी खांबेकर यांनी केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget