राज्यपाल कोश्यारी यांचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र

मुंबई -
राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी वरून महाराष्ट्रात उद्रेक झाल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उडी घेतली आहे. नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांसाठी निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे व आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.
भाजपच्या कार्यकाळात ५ सप्टेंबर २०१९ रोजी कोश्यारी यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली. मूळचे झारखंड येथील राजकारणी असलेले कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून विविध वादात अडकले आहेत. विशेषतः मागील विधानसभेत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. बहुमत नसताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटे झालेल्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी नंतर राजभवन वादाचा केंद्रबिंदू झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या शपथ विधी कार्यक्रमातही राज्यपाल कोश्यारी यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना तर राज्यपालांनी पुन्हा शपथ घेण्यासाठी फर्मावले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही राज्यपाल नियुक्त आमदार निवडणुकीवरून सरकार आणि राज्यपालांमध्ये खदखद सुरू आहे. विरोधी पक्षाचे नेते सातत्याने राज्यपालांकडे जाऊन राज्य सरकार विषयी तक्रारींचे पाढे वाचत आहे.मागील आठवड्यात राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या सदस्यांचा शपथविधी पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती उदयन राजे हे शपथ घेत असताना अशाच पद्धतीने घोषणाबाजी करण्यास आक्षेप घेतला होता. याचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. खुद्द खासदार भोसले यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अवमान झाला नाही, असे स्पष्टीकरण दिल्यानंतरही आवाज थांबला नव्हता. शेवटी उपराष्ट्रपती यांनी ट्विट करून याबाबत अवमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता असे स्पष्टीकरण दिले होते. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतःहून पुढाकार घेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अश्या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे.आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे किंवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे कोश्यारी यांनी त्या आपल्या पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्रात मंत्री पदाची शपथ देताना काही सदस्यांना आपण शपथ ‘लिहिली आहे त्याच स्वरुपात कुठलीही नावे न जोडता’ पुन्हा वाचण्याची सूचना केली होती, याचेही राज्यपालांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे.शपथेच्या प्रारूपापासून फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या स्तरावर विचार विनिमय करून सर्व संबंधितांना योग्य सूचना व मार्गदर्शक तत्वे देऊन शपथ विधी प्रक्रियेचे पावित्र्य जतन करण्याची विनंती राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे उभय पीठासीन अधिकार्‍यांना केली आहे. शपथेचा वाद अजून महाराष्ट्रामधे निवळला नसताना राज्यपालांनी पत्र पाठविल्याने आता राजकीय वर्तुळात कोणता नवीन वाद निर्माण होतो  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget