देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ ; ३२ हजार ६९५ जणांना संसर्ग

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताज नक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल ३२ हजार ६९५ नवे कोरोनाग्रस्त आढळले असून ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा९ लाख ६८ हजार ८७६ इतका झाला आहे. सध्या३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ६ लाख १२ हजार ८१५ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण २४ हजार ९१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत १० हजार ९२८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या२ लाख ७५ हजार ६४० वर गेली आहे. यातील एकूण १ लाख १२ हजार ९९ केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर १ लाख ५२ हजार ६१३ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण १ लाख १६ हजार ९९३ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ३ हजार ४८७ जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात ४४ हजार ५५२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २ हजार ७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये १ लाख ५१ हजार ८२० कोरोनाबाधित तर २ हजार १६७ जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये १ हजार १२, पश्चिम बंगालमध्ये १ हजार तर कर्नाटकमध्ये ९२८ जणांचा बळी गेला आहे.देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणाऱया पहिल्या ५ राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. रुग्णांचे बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget