कंगनाला शत्रुघ्न सिन्हांचा पाठिंबा

मुंबई -
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही व मक्तेदारीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. सध्या अभिनेत्री कंगना रानौत वारंवार या वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहे. घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत तिने कलाविश्वात नव्याने येणाऱ्या  कलाकारांवर अन्याय होत असल्याचे वक्तव्य केले. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपले जीवन संपवले असल्याचे ती सोशल मिडियाच्या माध्यमातून वारंवार सांगत आहे. 
कंगनाच्या या वादग्रस्त भूमिकेमुळे अनेक कलाकारांनी तिचा विरोध देखील केला. मात्र अभिनेते व राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कंगनाला पाठिंबा दिला आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी कंगना विषयी आपले मत मांडले आहे.ते म्हणाले, 'अनेक अडचणींचा सामना करत कंगनाने बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आता देखील ती फार चांगले काम करत आहे. असंख्य लोक कंगनाच्या विरूद्ध बोलतात, किंबहूना ते कंगनाचा विरोध देखील करतात.' असे  शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. शिवाय बॉलिवूडमध्ये कोणाच्याही आशीर्वादाशिवाय या मुलीने खूप यश संपादन केले. तिचे हे यश पाहून लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटू लागली आहे. असे म्हणत त्यांनी कंगनाचे कौतुक देखील केले. 
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खानवर सडकून टीका केली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झाली. याचा सर्वात मोठा फटका अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरूण धवनला बसला आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget