बीकेसीतील कोविड रुग्णालय पालिकेला हस्तांतरच केलेच नाही

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण झालेले एमएमआरडीएने बांधलेले फेज २ मधील कोविड रुग्णालय अद्याप पालिकेला हस्तांतरण झाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच या रुग्णालयाला अजून मेडिकल स्टाफच उपलब्ध झाला नसून तशा मागणीचे पत्र देखील संबंधित प्रशासनाला लिहिण्यात आले आहे.१७ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बिकेसी येथील एमएमआरडीएने बांधलेले फेज २ मधील कोविड रुग्णालय पालिकेला हस्तांतरण करून त्याचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला होता. याबाबत पालिकेकडे विचारणा केली असता, प्रत्यक्षात हे रुग्णालय अजून पालिकेला हस्तांतरणच झाले नसून त्याचे काम पूर्ण होणे बाकी आहे, असे मुंबई महापालिकेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी सांगितले.
२९ जूनला कोविड रुग्णालय बिकेसीच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारचे आरोग्य संचालक व मुंबई महापालिकेचे आरोग्य विभागाचे संचालक यांना पत्र लिहून रुग्णालयाला मनुष्यबळ पुरविण्याची मागणी केली आहे. फेज २ मधील कोविड रुग्णालयाच्या लोकार्पणाला आज १५ दिवस झाले तरी रुग्णालय लोकांच्या सेवेत उपलब्ध झाले नाही.१८ दिवसांत रुग्णालय बांधण्याचे काम पूर्ण केले. मग रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू होण्यास तत्परता का दाखवली नाही, असा सवाल मनसे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री व्हर्चुअल उद्घाटन करतात, तसेच हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार नसेल तर ते कोविड व्हर्चुअल म्युझियम म्हणून घोषित करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी व्यक्त केली.बिकेसी येथील फेज २ मधील कोविड रुग्णालयामध्ये एक हजार खाटांची व्यवस्था आहे. यात १०४ अतिदक्षता विभागातील खाट, १२ डायलिसिस खाकट, ऑक्सिजन व विना ऑक्सिजन खाट, सिटीस्कॅन मशीन, पोर्टेबल एक्सरे मशीन, ईसीजी मशीन, प्लस ऑक्सिमीटर, शवागर (१२ क्षमता) आदी सुविधा आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget