देशात कोरोना रुग्णात विक्रमी वाढ ; गेल्या २४ तासात ४९ हजार ३१० नवीन रुग्ण

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोना रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला आला. गेल्या काही दिवसांपासून दररोज ३५ ते ४० हजार नव्या रुग्णांची भर पडत होती. मात्र, गेल्या २४ तासात तब्बल ४९ हजार ३१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ७४० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या १२ लाख ८७ हजार ९४५ वर पोहचली आहे. तर ४ लाख ४० हजार १३५ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच यात दिलासादायक बाब म्हणजे, तब्बल ८ लाख १७ हजार २०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील आतापर्यंत एकूण ३० हजार ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वांत जास्त प्रभाव पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३ लाख ४७ हजार ५०२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील १२ हजार ८५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ४० हजार ३९५ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील १ लाख ९४ हजार २५३ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण १ लाख २७ हजार ३६४ वर पोहचली आहे. त्यातील आतापर्यंत ३ हजार ७४५ जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात ५२ हजार ४७७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यातील २ हजार २५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये १ लाख ९२ हजार ९६४ कोरोनाबाधित त्यातील ३ हजार २३२ जणांचा बळी गेला आहे.कोरोना चाचणी क्षमता वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने आतापर्यंत तब्बल १ कोटी ५१ लाख २८ हजार १७० कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. गुरुवारी एकाच दिवसात ३ लाख ५२ हजार ८०१ कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget