गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीला अटक

पिंपरी-चिंचवड -  गोळीबार करणारे अज्ञात आरोपी एका वर्षांपासून फरार होते. त्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहीत नागेश गवळी (वय-३०) अश्फाक अब्दुलरज्जाक सय्यद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी एक तरुण त्याच्या मैत्रीणीसोबत हॉस्पीटलवरून रात्री पावणेबाराच्या सुमारास भोसरी येथील घरी पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी तरुणाला व त्याच्या मैत्रिणीला थांबण्यास सांगितले. मात्र, तरुणाने आरोपींना प्रतिकार केला आणि आरोपींना ढकलून दिले. त्यावेळी त्यातील एका आरोपीने त्याच्याजवळ असलेले पिस्टल काढले. तूझे पिस्टल खोटे आहे असे तरुणाने आरोपीला म्हटले. यावरून आरोपीने गोळीबार केला होता. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आशिष गोपी, गणेश हिंगे यांना सोमवारी माहिती मिळाली की, गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपी अंकुशराव लांडगे नाट्यसभागृहा शेजारील मोकळ्या मैदानात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी नाट्यगृहाच्या परिसरात सापळा लावला. पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी मागील वर्षभरापूर्वी गोळीबार केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सदर ची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, समीर रासकर, संतोष महाडीक, अजय डगळे, सुमित देवकर यांच्या पथकाने केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget