ठाण्यात पुलावरून कंटेनर पडला ; चालकाचा मृत्यू

ठाणे -
सर्वात मोठा आणि वळणदार असलेल्या माजिवाडा पुलावर अपघात झाला. अवघड वळणावरून औषधाने भरलेला कंटेनर पुलावरून तब्बल १०० फूट खाली कोसळला. यामध्ये कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आणि क्लिनर जखमी झाला आहे.
शनिवारी पहाटे घोडबंदरवरून औषधाने भरलेला कंटनेर नाशिककडे जात होता. यावेळी माजिवाडा पुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरून १०० फूट खाली कोसळला. यामध्ये आझाग नावाचा चालक जागीच ठार झाला, तर सोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. कापूरबावडी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच अपघात झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. याप्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहे.या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक अवघड वळणे देखील आहेत. त्यामुळे अनेकदा याठिकाणी अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी एक दुचाकी चालक देखील पुलावरून खाली पडल्यामुळे मृत्युमुखी पडला होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget