नांदेड महापौर, उपमहापौर निवडणुक तीन महिने पुढे ढकलली

मुंबई - नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौर निवडणुकीला पुन्हा पुढे ढकलली असून, तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात अध्यादेशात सुधारणा करण्याचा गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या निर्णयाला मान्यता देण्यात आली.
नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौर पदाचा प्रचलित अडीच वर्षाचा पदावधी १ मे २०२० मध्ये संपुष्टात आली. तसेच कोरोना विषाणुमुळे उद्भभवलेल्या आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीमुळे तेथे निवडणुका घेणे शक्य नसल्याने महापौर, उपमहापौर यांच्या निवडणुका कोविड-१९ च्या संक्रमणामुळे तीन महिने पुढे ढकलणे आणि विद्यमान महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ देणे यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता.
हा अध्यादेश २७ एप्रिल २०२० पासून अंमलात आला असून, तीन महिन्यांच्या कालावधीकरीता म्हणजेच २७ जुलै २०२० पर्यंत ही मुदतवाढ लागू होती. या अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ २७ जुलै २०२० रोजी संपत असल्याने, तसेच अद्यापही राज्यामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव कायम असल्याने, महापौर निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने या अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ पुढील तीन महिन्यांसाठी वाढविण्यास्तव अध्यादेशात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता दुसऱ्यांना मुदतवाढ मिळाली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget