मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शेख हे मालवणी या विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. या विभागात तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना शेख यांचा अनेकांशी थेट संबंध आला आहे. त्यामुळे त्यांना लागण झाली असावी, असे शेख यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.शेख यांच्या तब्येतीबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे ट्विट शेख यांनी केले. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना ही चाचणी करून घेण्याची सूचना त्यांनी ट्विटद्वारे केली. तर याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारांनंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १० हजार ४५५ लाखांवर पोहोचली आहे. तर १ लाख ६९ हजार ५६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget