सावधान ; तीन पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील

मुंबई - मुंबईतील इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असतानाही, त्या इमारतींमधील रहिवाशी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसले आहे. त्यामुळे आता तीन पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आलेल्या इमारतीला पूर्ण सील करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहे.
मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. हा रुग्ण इमारतीमध्ये राहणारा होता. विदेशात प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. याच दरम्यान घरात काम करणाऱ्या कामगारांच्या माध्यमातून कोरोना झोपडपट्टीत पोहचला. पाहता-पाहता मुंबईमधील धारावी, वरळी सारख्या झोपडपट्टीला कोरोनाने विळखा घातला. पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचणी, उपचार करत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करत झोपडपट्टीतील कोरोनाला नियंत्रणात आणले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन शिथिल होताच कोरोना इमारतीमध्ये घुसला आहे.सध्या मुंबईत झोपडपट्टीपेक्षा इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अंधेरी ते दहिसर, भांडुप, मुलुंड, ग्रँटरोड आदी विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. इमारती कॉम्प्लेक्समध्ये सोशल डिस्टनसिंग, मास्क न लावणे आदी प्रकार समोर येत आहेत. नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करून घ्या, असे आदेश सर्व विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.झोपडपट्टी आणि चाळीत एखादा रुग्ण असल्यास लपून राहणे शक्य नसल्याने रुग्ण समोर येतो. मात्र, रुग्ण इमारतीत असल्यास रुग्णाची माहिती लवकर समोर येत नाही. या दरम्यान सदर रुग्ण इतरांच्या संपर्कात आला असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी एकाच इमारतीमध्ये तीन पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

इमारतींमधील रहिवाशांना आरोग्य विभाग आणि पालिकेने सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कोरोना रुग्ण आढळून आला की, सुरुवातीला ती इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सील केली जायची. या इमारतीमधील रहिवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाण्यास मज्जाव होता. यात काही सूट देत पालिकेने रुग्ण आढळून आलेला इमारतीचा मजला किंवा विंग सील करण्याचा निर्णय घेतला होता. आता इमारतींमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने पालिकेने एकाच इमारतीत तीन पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणारी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget