दिल्लीत पावसाचा हाहाकार ; दोन जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - दिल्लीत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असून, सकाळपासून विविध भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. एका नाल्यात दुमजली घर वाहून गेल्याची दृश्येही समोर आली आहेत.दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. प्रसिद्ध मिंटो ब्रिजच्या खालीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने काही गाड्या या ठिकाणी अडकून पडल्य ब्रिजच्या खाली पाण्यात पिकअप ड्रायव्हरचा मृतदेह आढळला. 
आयटीओ परिसरातील अन्ना नगर येथली झोपडपट्टीतील एक घर नाल्यात अक्षरशः वाहून गेल्याचीही घटना घडली. नाल्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता. शिवाय वाहत्या पाण्यामुळे घरांच्या खालचा भागही काही प्रमाणात आधीच वाहून गेला होता. नंतर दुमजली घरही नाल्यात कोसळले आणि नाहिसे झाले.सुदैवाने या घरात कोणी नव्हते.त्यामुळे जीवित हानी झाली नाही.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget