कपिल शर्मा शो ची शूटिंग सुरु

मुंबई - देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे गेले काही महिने सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग बंद होती. आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर हळूहळू सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग सुरु करण्यात आली आहे. काही कार्यक्रमाचे नवीन एपिसोडही टेलिकास्ट केले आहेत. आता ‘द कपिल शर्मा शो’ ची शूटिंगही सुरु होत आहे. कपिल शर्मा आणि भारती सिंहने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. १२५ दिवसांनी ‘द कपिल शर्मा शो’ ची शूटिंग सुरु होत आहे. सोशल मीडियावर जे व्हिडीओ शेअर झाले आहेत. त्यामध्ये सुमोना आणि भारती सॅनिटायझर लावत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण आता लवकरच चाहत्यांना कपिल शर्मा शो चा नवीन एपिसोड पाहता येणार आहे. चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा कार्यक्रम बंद झाला होता तेव्हा अनेक चाहते कपिलची आठवण काढत होते.या लॉकडाऊनमध्ये कपिलने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. हा लॉकडाऊनचा वेळ माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला मिळत आहे. तसेच मला माझी मुलगी अनायरासोबत खेळायलाही मिळत आहे, असे कपिल शर्माने सांगितले.
भारती सिंहनेही लॉकडाऊनमध्ये आपल्या पतीसोबत वेळ घालवला. मी यावेळीही गणपती पूजा करणार आहे. जसे होत आलेय तसेच होत राहणार. कारण माझ्या घरी नेहमी इको फ्रेण्डली गणपती येतो आणि घरीच त्यांचे विसर्जन केले जाते. यासाठी मला बाहेर जावे लागत नाही. पण यावेळी गणपीतच्या दर्शनासाठी येणे जाणे कमी होईल, असे भारतीने नुकतेच एका चॅनलेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget