कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार ; ८ पोलिसांना वीरमरण

कानपूर - यूपीमध्ये कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार करण्यात आला असून,८ पोलिसांना वीरमरण आले आहे. तसेच पोलीस अधिकारी बिठूर यांच्यासह ६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. वीरमरण आलेल्यांमध्ये पोलीस अधिकारी बिल्हौर देवेंद्र मिश्र, पोलीस अधिकारी शिवराजपूर महेश यादव, एका पोलीस निरीक्षकासह ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विकास दुबे नावाच्या आरोपीने पोलीस ठाण्यात घुसून राज्यमंत्री आणि पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. यानंतर पोलीस पथक चौबेपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील विकरु गावात आरोपींचा शोध घेण्यासाठी गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यात ८ पोलिसांना वीरमरण आले आहे. तर यात बिठूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कौशलेंद्र प्रताप सिंह यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर कानपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपींनी त्याआधीच घटनास्थळावरुन पळ काढला. पुढील तपास सुरू आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget