लाच प्रकरणात नाशिकच्या एनडीएसटीच्या अध्यक्षाला अटक

नाशिक - माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सातवा वेतन आयोग फरक प्रकरणात रामराव बनकर यांचा सहभाग असलेल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.मागील महिन्यात नाशिकमध्ये दोन व्यवस्थापकांना १९ हजार ७१५ रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. यात शरद जाधव आणि जयप्रकाश कुवर या दोघांना अटक करण्यात आली होती.या दोघांनाही तक्रारदाराकडून १९ हजार ७१५ रुपयांची लाच मागितली होती. या दोघांनी तक्रारदाराला सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी आणि नियमित पगार काढून देण्याच्या मोबदला मागितला होता. त्यानुसार, सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद जाधव, जयप्रकाश कुवर यांची चौकशी केली असताना रामराव बनकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले. तपासात रामराव बनकर यांचे मोबाईलवरील संभाषणाचा पुरावा एसीबीच्या हाती लागला. त्यानंतर बनकर यांचा या लाचखोरी प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले. अखेर आज, लाचलुचपत विभागाने बनकर यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा अधिक तपास अधिकारी करत आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget