ऑनलाईन अभ्यासाचा तणाव ; विद्यार्थीनीने केली आत्महत्या

कोल्हापूर - राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत त्यामुळे ऑनलाईन अभ्यास शिकवला जात आहे. ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचे स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. गुरूवारी कुणीही नसल्याचे पाहून तरूणीने फॅनला साडीने गळफास लावून घेतला. गेले पाच-सहा दिवस तरूणी नैराश्यात होती, अशी माहिती पालकांनी दिली. 
ऐश्वर्या बाबासो बाटील असे या वीस वर्षीय तरूणीचे नाव आहे. करवीर तालुक्यातील वाशी या गावात राहणारी तरूणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या पाटील ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाईन शिक्षण तिला जमत नव्हते. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ती अस्वस्थ आणि निराश होती.याच नैराश्यातून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी तातडीने तरूणीला रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget