राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार नाही - ओमर अब्दुल्ला

श्रीनगर - 
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रात मंत्री असलेले ओमर अब्दुल्ला यांनी, आपला पक्ष नेशनल कॉन्फ्रेंससाठी आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी काम करत राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.अनेक दशकांनंतर, बदललेल्या परिस्थितीत, या केंद्रशासित प्रदेशात परिसीमन प्रक्रियेनंतरच निवडणूका घेण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर दोन केंद्र शासित प्रदेशात विभागले गेले होते.मी राज्याच्या विधानसभेचा नेता राहिलो आहे. ही एकेकाळी सर्वात मजबूत विधानसभा होती, जी आता देशातील सर्वात शक्तिहीन विधानसभा बनली आहे, मी याचा सदस्य होणार नाही. ही धमकी किंवा ब्लॅकमेल नाही किंवा हे निराशेचे लक्षणही नाही. ही एक सामान्य कबुली आहे, ज्यात मी कमजोर विधानसभा किंवा केंद्रशासित प्रदेश विधानसभेचा भाग होऊ इच्छित नाही, असे ते म्हणाले.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget