सिडकोच्या घरांचे लवकरच होणार वाटप

नवी मुंबई -
सिडकोने दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या महागृहनिर्माण सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांची लवकरच वाटप प्रक्रिया राबवली जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली चार महिने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात सिडकोने लाभार्थी ग्राहकांच्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेल्या आहेत. यासाठी आता ‘निवारा केंद्र’ या सोडतीनंतरच्या पोर्टलद्वारे ऑनलाइन सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाला सिडकोत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
महामुंबई क्षेत्रात सिडकोने दोन लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. यासाठी जमिनीची शोध आणि आराखडे तयार करण्याचे काम प्रशासन पातळीवर सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची सोडत काढली होती. या घरांचे बांधकाम शहरातील विविध भागात सुरू आहे. ही घरे मिळालेल्या भाग्यवंत ग्राहकांची कागदपत्र पडताळणी सुरू असतानाच मार्च महिन्यापासून देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या पणन विभागाने पहिले दोन महिने वाट पाहिल्यानंतर ऑनलाइन कागदपत्रे दाखल करणे, त्यांची छाननी, तक्रारी, सद्यस्थिती ही कामे सुरू करण्यात आली. त्यामुळे या काळात सिडको सहा हजार अर्जाची पडताळणी करू शकली. पुरेशी कागदपत्र सादर न करणाऱ्या ग्राहकांची घरे रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी सिडको त्या ग्राहकांची सुनावणी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असली तरी नवी मुंबईत अद्याप टाळेबंदी कायम आहे. त्यामुळे सिडकोत सुनावणीसाठी येणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिडको या ग्राहकांची ऑनलाइन सुनावणी घेणार असून ग्राहकाकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली जाणार आहे. यासाठी दूरचित्रसंवादाने त्या ग्राहकांशी संपर्क साधला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्या अधिकाऱ्याची ओळख दिसू न देण्याची खबरदारी या दूरचित्रसंवादात घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक राहावी यासाठी सिडकोचे हे प्रयत्न आहेत.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget