कोपर खैरणेतील बँक दरोड्यातील तिघांना अटक

नवी मुंबई - कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवरदरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असून त्यांची सराईत टोळी असल्याचेही समजते.कोपर खैरणे सेक्टर १९ येथील सारस्वत बँकेवर गुरुवारी दुपारी दरोडा पडल्याची घटना घडली होती. बँकेत आलेल्या अज्ञात दोघांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकररूम उघडण्यास भाग पाडले होते. यानंतर लॉकर मधील सुमारे साडेचार लाखाची रोकड लुटून त्यांनी पळ काढला होता.
याप्रकरणी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. तपासादरम्यान सीसीटीव्हीमधून संशयितांची माहिती समोर आली होती. त्याद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी तपास पथके तयार केली होती. त्यामध्ये सहायक निरीक्षक शेख यांच्या पथकाला मुंबईत लपलेल्या संशयितांची माहिती मिळाली होती.यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता तिघेजण हाती लागले आहेत, तर त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार अद्याप फरार आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असतानाही घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget