युजीसीने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा - उदय सामंत

कोल्हापूर - कोरोनाच्या संकटामध्ये परीक्षा घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. अचानक कोरोनाचे संकट दूर होणार आहे का? युजीसीने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी येऊन परीक्षा कशी देऊ शकतात, ते युजीसीने सांगावे, असे उदय सामंत म्हणाले आहेत. 
कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. राज्यातल्या सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करुन सरकारने निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे हे काम काय रोबोट करु शकणार नाहीत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. मी ६० जीआर काढून ते मागे घेतले नाहीत, तर एकच जीआर काढला आणि त्याच्या मागे लागलो, असे म्हणत उदय सामंत यांनी विनोद तावडेंनाही प्रत्युत्तर दिले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे याचे कुणीही राजकारण करू नये. मुलांच्या परीक्षांबाबत पालकांनी चिंता करू नये, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असेही उदय सामंत म्हणाले. 
सीमा भागामधील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरू करणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही उदय सामंत यांनी केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget