सरकार पाडून दाखवा ; मुलाखतीतुन उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे आव्हानच दिले आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत २५ व २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. 
दरम्यान आजच्या प्रोमोत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि चीनविषयीही भाष्य केल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे, असे म्हणतात. मग केंद्रात किती चाकी सरकार आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना आत्ता तुम्हाला चीन नको आहे,. पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?, अशी शंकाही उद्धव यांनी बोलून दाखविली आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधून कोणता नवा संदेश दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget