कोल्हापुरमधील विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील तंत्र शिक्षण विभागातील विलगिकरण केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विलगीकरण कक्षातील वॉर्डबॉयने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला. संबधित वॉर्डबॉय विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे सुविधा मिळत नसल्यने अन्य लोकांनी ही विलगीकरण कक्षातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. एकाच वेळी घडलेल्या दोन्ही प्रकारामुळे विलगीकरण कक्षात नागरिकांनी गोंधळ केला होता. 
पनवेलमधील विलगीकरण कक्षात ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्ये याची पुनरावृत्ती झाल्याने विलगीकरण कक्षात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget