विकास दुबेची माहिती मिळविण्यासाठी एसआयटीने जारी केला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, पोस्टल पत्ता

कानपुर ( उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेला पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी (एसआयटी) करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीच्या चौकशी दरम्यान गावातील नागरिकांनी विकास दुबेच्या गुन्हेगारीविषयी माहिती दिली. तसेच विकास दुबेच्या गुंडगिरीसंदर्भात माहिती असलेल्या लोकांसाठी एसआयटीने मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी पोस्टल पत्ता जारी केला आहे.
एसआटीने तीस सदस्य असेलेले विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम तयार करण्यात आली आहे. एसआयटी टीममध्ये एडीजी हरिराम शर्मा आणि डीआयजी जे रविंद्र गौड यांचा समावेश आहे. या प्रकरणासंबधित माहिती असलेल्या लोकांना एसआयटीशी संपर्क साधण्यासाठी विशेष तपास पथकाने शुक्रवारी मोबाईल क्रमांक,ई-मेल आयडी पोस्टल पत्ता जारी केला आहे.एडीजी हरिराम शर्मा आणि डीआयजी जे रविंद्र गौड यांचा समावेश असलेल्या चौकशी पथकाला ३१ जुलैपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडे आपला चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे लोकांनी २० ते २४ जुलै दरम्यान दुपारच्या वेळी संपर्क साधावा, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.संबधित प्रकरणातील माहिती देणाऱया व्यक्तींची भूसरेड्डी यांच्या कार्यालयात चौकशी केली जाईल. ज्यांना पुरावे किंवा मौखिक माहिती द्यावीशी वाटते, ते २० ते २४ जुलै दरम्यान दुपारी वैयक्तिकरित्या भेटू शकतात, असेही निवेदनात म्हटले आहे. तपशील किंवा पुरावा देण्यास इच्छुक असलेले लोक फोन, ईमेलवर किंवा पत्राद्वारेही ते देऊ शकतात, असेही निवेदनात म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget