मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार

मुंबई - राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले असताना मुंबईमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. असा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांच्या ७ जणांच्या टोळीला अन्न आणि औषध पुरवठा विभागाने छापा टाकून अटक केली आहे.हे विक्रेते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. ही टोळी कोरोनावर असलेले उपचार करण्यासाठी रेमडेसीविर इंजेक्शन ३० ते ४० हजार रुपयांत विकत होते. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना रुग्णांवर परिणामकारक असलेले रेमडेसीविर इंजेक्शन ज्याची किंमत ५ हजार रुपये आहे, ते इंजेक्शन तीस ते चाळीस हजार रुपयात विकत असल्याची माहिती अन्न व औषध पुरवठा विभागाला मिळाली.यावर या विभागाने मुलुंडमध्ये आपला खबरी पाठवून त्याची शहानिशा केली. खात्री झाली असता त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यातून दोन नाव समोर आली. त्यानंतर एफडीए ने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ७ ला कळवून मदत घेतली आणि एकूण ७ जणांना अटक केली.ही टोळी त्या औषध कंपनीतून ते परस्पर रेमडेसीविर विकत असल्याची माहिती मिळाली असून यात अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच एक लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget