नालासोपाऱ्यात एकावर तलवारीने हल्ला

नालासोपारा - शहरात काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने एकावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मित्राच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या एका तरुणांवर काही तरुणांनी तलवारीने हल्ला केला.नालासोपारा पूर्व प्रगती नगरमध्ये सोमवार २९ जून रोजी ही घटना घडली होती. मात्र, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य पुढे आले. तुळींज पोलिसांनी सांगितले की, संजय मिश्रा ( २२) याचा मित्र सलमान याचे तीन मित्रांशी भांडण सुरु होते. ते सोडविण्यासाठी संजय याने मध्यस्ती केली. त्यामुळे सलीम, नूर आणि पप्पू या तीन जणांनी तलवारीने आणि काठीने संजयवर हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
संजय याच्या तक्रीरीनंतर तुळींज पोलिसांनी चार जणांविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी गुरुवारी एका आरोपीला अटक केली आहे. तीन जण फरार आहेत. हे सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget