आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपच्या पदाधिकारी महिलेला अटक

ठाणे - मिरा भाईदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका महिला पदाधिकारीला अटक केली आहे. नकली ऑडिओ क्लिपबाबत गीता जैन यांनी १७ जुलैला नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करुन भाजप पदाधिकारी आरोपी रंजू झा या महिलेला अटक करुन कोर्टात हजर केले.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्र सरकारच्या नावे कोरोनाबाबत चुकीची माहिती दिली जाऊन, पैशाबाबतचा संवाद आहे. केंद्र सरकार प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानुसार, महापालिकांना दीड लाख रुपये देत असल्याचा चुकीचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. खासगी डॉक्टर, प्रयोगशाळा, आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्यासाठी लक्ष ठेवत आहे, असेही या क्लिपमध्ये नमूद आहे.इतकेच नाही तर साधा सर्दी-ताप असला तरी जबरदस्तीने कोरोना रुग्ण म्हणून अ‍ॅडमिट केले जात असल्याचेही या क्लिपमध्ये म्हटले आहे. दीड लाख रुपये महापालिकेला मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाला घरी पाठवले जाते, त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे, असा दावा करुन तपासणी बंद करा, असे आवाहन या क्लिपमध्ये केले आहे. ही क्लिप आमदार गीता जैन यांचा नकली आवाज काढून व्हायरल करण्यात आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी रंजू झा या महिलेला अटक केली आहे. रंजू झा ही भाजपची उत्तर भारतीय महिला मोर्चाची मीरा भाईदर उपाध्यक्ष आहे. पोलीस कारवाईनंतरही आपल्याला अटक झाली नाही, असा दावा रंजू झाने केला होता. मात्र पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले असता, कोर्टाने तिला जामीन मंजूर केल्याचे समोर आले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget