नोकरी जाण्याच्या भीतीने एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

धारवाड -
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले तर काही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली. याच दरम्यान नोकरी गेल्याच्या विवंचनेतून दाम्पत्याने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनामुळे नोकरी गेली तर जगायचे कसे आणि दुसरी मिळणार कशी या भीतीपोटी एकाच कुटुंबातील तीन जणांनी आपले आयुष्य संपवल्याची घटना कर्नाटकातील धारवड इथे घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट मिळाली आहे. दरम्यान तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य लॉकडाऊन आणि कोरोनामुळे नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे अस्वस्थ होते. त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक काम बंद पडल्याने मजुरांची परवड झाली. आर्थिक चणचण आणि मोठा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसल्यानं कर्मचारी कपातीचे मोठे संकट आले. त्यामुळे अनेकांनी रोजगार गमवले तर काही गमवण्याच्या भीतीत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करताना नोकरी जाण्याच्या भीतीने दाम्पत्याने आपल्या मुलीला संपवले आणि नंतर आत्महत्या केली.या प्रकऱणी पोलिसांना केवळ सुसाईट नोट मिळाली आहे.पोलीस अधिक तपास  करत आहेत. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget