पीएमसी बँक घोटाळा ; वाधवान कुटुंबाच्या मालमत्तेचा ऑगस्टमध्ये लिलाव

मुंबई - पीएमसी बँकेला कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या वाधवान (एचडीआय कंपनी) कुटुंबीयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतील दोन विमानाचा आणि एका बोटीचा लिलाव आता होणार आहे. पीएमसी बँकेकडून ऑगस्टमध्ये हा लिलाव करण्यात येणार आहे. महागडी आणि नामांकित कंपनीची ही विमानं असून आता या लिलवातून पीएमसी बँकेला किती रक्कम मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पीएमसी बँकेच्या संकेतस्थळावर या लिलावाबाबतची माहिती टाकण्यात आली. या माहितीनुसार वाधवान कुटुंबाच्या मालकीच्या जप्त दोन विमान आणि एका बोटीचा लिलाव करण्यात येणार आहे. १७ ऑगस्टला दुपारी २ वाजता बँकेच्या भांडुप पश्चिम शाखेत बोटीचा लिलाव होईल. तर २१ ऑगस्टला दोन विमानाचा लिलाव होईल. एक विमान Dassault falcon कंपनीचे तर एक विमान Bombardier challenger कंपनीचे आहे. या विमानांची किंमत २०० ते ३०० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. तर बोट Ferrerti yach 881 या कंपनीची आहे. तर याची किंमत ४० ते ५० कोटींच्या घरात आहे.
या लिलावासाठी बॅंकेने निश्चित अशी किंमत लावलेली नाही. पण जो अधिकाधिक किंमत लावेल त्याला ही विमान आणि बोट विकली जाणार आहे. त्यामुळे आता या लिलावातून नेमकी किती रक्कम मिळणार हे आता महत्वाचे आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget