पाकच्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर - पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकने केलेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील खारी-कर्मा गावातील हे नागरिक आहे, अशी माहित सूत्रांकडून मिळाली आहे.मृत झालेल्या नागरिकांमध्ये नवरा-बायकोचा समावेश असून मृतात त्यांच्या लहान मुलाचा ही समावेश आहे. या गावात पाकिस्तानच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे.पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात ८ जुलैला शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जिल्ह्यातील मेंधार सेक्टरमध्ये मोर्टार डागल्याने एक नागरिक जखमी झाला आहे. वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानकडून रात्री २ वाजता मेंधार सेंक्टर आणि बालाकोट परिसरात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर २. ४५ ला गोळीबार थांबला. गेल्या आठवडाभरात बालाकोट सेक्टरमधील ही दुसरी घटना आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget