व्यंकय्या नायडूंचा शिवरायांच्या घोषणेला विरोध ; हिंदूत्ववादी संघटनेकडून निषेध

पुणे - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ पूर्ण झाल्यानंतर शेवटी त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी', असा जयघोष केला. उदयनराजेंनी अशी घोषणा दिल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मात्र उदयनराजेंना समज दिली. हा शपथविधी सोहळा माझ्या दालनात होत आहे, इथे घोषणा देण्यासाठी परवानगी नाही आणि हे पटलावर रेकॉर्ड होणार नाही, असेही सांगितले.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरून शपथविधीचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. व्यंकय्या नायडू यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले असून त्यांच्याविरोधात तीव्र भावना व्यक्त करताना दिसत आहेत.पुण्यातील हिंदूत्ववादी संघटना असलेल्या ब्राह्मण महासंघानेही नायडू यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. 'स्वतःच्या राज्याची मर्यादा, संस्कार दाखवत असताना फक्त सदनच नाही तर जगभर लुंगी घालून फिरणारे व्यंकय्या नायडू महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दैवताच्या घोषणेला विरोध करतात हे अनाकलनीय आहे. जोपर्यंत व्यंकय्या नायडू आणि भाजप या कृतीचे स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होऊ नये, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.राज्यसभेत यापूर्वीही शपथविधी झाल्यानंतर अनेकांनी घोषणा दिल्या आहेत. तेव्हा कधी कुणाचा अपमान झालेला नाही. कालच्या घटनेवरून व्यंकय्या नायडू यांच्या मनात महाराष्ट्राविषयी असलेला आकस स्पष्टपणे दिसत आहे. जोपर्यंत भाजप आणि नायडू यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत उदयनराजेंनी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहनही दवे यांनी यावेळी केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget