मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

लखनऊ - मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल टंडन आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. लालजी टंडन यांचे चिरंजीव आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. काल रात्रीपासून राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती खालावली होती. त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती लखनऊमधील मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली होती. टंडन यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 
आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.'बाबूजी नही रहे' अशा शब्दात त्यांनी टंडन यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.लालजी टंडन हे भाजपचे एक महत्वाचे नेते होते. यापूर्वी ते बिहारच्या राज्यपालांची जबाबदारी सांभाळत होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जवळचे म्हणून लालजी टंडन यांचे नाव घेतले जायचे. अटलजी यांचे सक्रिय राजकारणापासूनचे अंतर कमी झाल्यानंतर लालजी टंडन यांनी लखनऊच्या जागेवरुन निवडणूक लढविली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget