सोनू सूदकडून महाराष्ट्र पोलिसांना अनोखी भेट

मुंबई - देशात करोनाचे संकट असून, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा कलाकार सोनू सूद हा सर्वांनाच मदतीचा हात देत असल्याचे दिसत आहे. अशातच सोनू सूदने महाराष्ट्र पोलिसांसाठी तब्बल २५ हजार फेस शिल्ड दिल्या आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोनू सूदचे आभारही मानले आहेत.
अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोनू सूद आणि त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार, असे कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिले आहे. सोनू सूदच्या या कार्यांबद्दल अनेकांकडून त्याची स्तुतीही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही अनेक युझर्सने त्याचं कौतुक केले आहे. तर दुसरीकडे सोनू सूदनेही तो फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “आपले पोलीस बांधव आणि भगिनी हे खरे हिरो आहेत. ते करत असलेल्या कार्यासमोर हे फारच कमी आहे,” असे तो म्हणाला.
यापूर्वी सोनू सूदने प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती. आतापर्यंत त्याने हजारो प्रवासी मजुरांना सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले आहे. सुरूवातीला त्याने बसेसमधून मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडले होते. त्यानंतर त्याने अनेकांना रेल्वेगाड्या आणि विमानांद्वारेही घरापर्यंत पोहोचवले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget