राजस्थान सत्ता संघर्ष ; गेहलोत गटाचे राजभवनात शक्तिप्रदर्शन

जयपूर - राजस्थानमधील बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात  कारवाई करण्यास विधानसभाध्यक्षांना मनाई करणारा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवला. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी राजभवनात शक्तिप्रदर्शन केले.
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा संयमही सुटू लागला असून शुक्रवारी कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सचिन पायलट यांच्यावर आगपाखड केली. ‘‘पायलट यांना मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्यांनी तसे सांगावे. कशाला विरोध करता? तुम्ही भाजपमध्ये जाणार नाही असे म्हणता मग, हरियाणामध्ये काय करत आहात? प्रदेश काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित का राहात नाही? लोकांसमोर पक्षाचा ‘तमाशा’ मांडू नका’’, अशा शब्दांत सिब्बल यांनी पालयट यांच्यावर टीका केली.
राज्यस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी पायलट गटाच्या १९ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर पायलट गटाने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयाने तीनवेळा सुनावणी पुढे ढकलत बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास विधानसभाध्यक्षांना मनाई केली. विधानसभाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयातील सुनावणी थांबवण्याची विनंती केली, मात्र लोकशाहीत विरोधी मतेही ऐकून घेतली पाहिजेत, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. शुक्रवारी उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी पुढे ढकलल्यामुळे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी गेहलोत सरकारने राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे केली.
राजस्थानातील सत्तासंघर्षांची न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता दिसू लागल्याने शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या समर्थक आमदारांची बैठक घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन घ्यावे, असा निर्णयही घेण्यात आला. यासंदर्भात गेहलोत यांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र राज्यपालांनी अधिवेशनाबाबत निर्णय न घेतल्याने शंभरहून अधिक आमदारांनी थेट राजभवन गाठून विशेष अधिवेशनासाठी धरणे आंदोलन केले.
दरम्यान,काँग्रेस नेतृत्वाच्या प्रयत्नानंतरही पायलट यांचे बंड थंडावलेले नाही. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले की, पायलट यांनी हॉटेलमध्ये न बसता बाहेर यावे आणि उघडपणे बोलावे, स्वतंत्र पक्ष काढायचा असेल तर तसे सांगावे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget