पालघर जिल्ह्यात आढळले १०५ कोरोना रुग्ण; ३२ रुग्णांचा मृत्यू

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी १०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिलासादायक बाब म्हणजे ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ५१३ इतकी झाली असून, ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या १०५ कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण म्हणजेच ५० रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. ३३ डहाणू तालुक्यातील, ५ वाडा तालुक्यातील आणि १७ वसई ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत एकूण १ हजार ८४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यातील कोरोना परिस्थिती -राज्यात गुरुवारी ९ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ लाख ४७ हजार ५०२ झाली आहे. गुरुवारी नवीन ६ हजार ४८४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ९४ हजार २५३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget