सिंगापूरच्या 'एजंट'वर अमेरिकेत चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

वॉशिंग्टन -
येओ जून वेई नामक व्यक्तीला वॉशिंग्टन डिसीच्या न्यायालयाने अमेरिकेत हेरगिरी केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. यासाठी त्याने स्वत:च्या राजकीय सल्लागार पदाचा गैरवापर करत अमेरिकेचे सैन्य, सरकारी कर्मचारी यांच्याकडून सोशल नेटवर्किंग आणि मीडिया साइट्स संदर्भात परवानग्या मिळवल्या. या व्यक्तीने सर्व गोष्टी चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या निर्देशानुसार केल्या असून अमेरिकी नागरिकांकडून संवेदनशील माहिती मिळवल्याचे अमेरिकेच्या न्यायालयाने सांगितले.
येओ जून वेई याला शुक्रवारी(२५ जुलै) वॉशिंग्टन डिसीच्या फेडरल कोर्टाने दोषी ठरवले आणि त्याच्यावर 'अनधिकृत फॉरेन एजंट'चा ठपका ठेवण्यात आला आहे.न्यायालयातील माहितीनुसार या व्यक्तीने अमेरिकेत एक कन्सल्टन्सी कंपनीची सुरुवात केली. यामार्फत त्याने अमेरिकेतील प्रतिष्ठित मान्यवरांकडून तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांकडून संवेदनशील माहिती गोळा केली. याचा पुरवठा त्याने चीनच्या गुप्तचर यंत्रणेला केला. अमेरिकेचे सैन्यदल तसेच अनेक सरकारी विभागांच्या सोशल मीडिया नेटवर्किंसंदर्भात सिक्युरिटी कोड्स आणि अन्य बाबींमध्ये मंजूरी मिळवण्याचा त्याचा हेतू होता. योओ अमेरिकी अधिकाऱ्याकडून अशियातील काही ग्राहकांसाठी रिपोर्ट्स लिहून घेत असे. मात्र यातील माहिती थेट चीनच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवण्यात येत होती.येओ जून वेई याला २०१५ मध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेने भरती केले होते. यावेळी तो बीजिंगमध्ये कामानिमित्त आला होता. यावेळी त्याला गुप्तचर यंत्रणेमार्फत प्रेझेन्टेशन देण्यात आले. त्यामध्ये दक्षिणपूर्व आशियातील राजकीय आणि अन्य परिस्थितीची माहिती होती, असे न्यायालयीन कागदपत्रांमध्ये अंतर्भूत आहे. कोर्टात सादर करण्यात आलेल्या 'स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स'मध्ये गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याची येओला जाणीव होती, असे त्याने कबूल केले आहे. तसेच यासाठी त्याला चीन सरकारडून विशेष वागणूक मिळत होती. यादरम्यान तो अनेक चीनी हेरांना देखील भेटत असल्याचे देखील समोर आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget