नवी मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

नवी मुंबई - नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. क्वारंटाईन सेंटरमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे पुढे आले आहे. पनवेल पोलिसांच्या माहितीनुसार नवी मुंबईतील क्वारंटाईन केंद्रावर एका डॉक्टरने ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. पीडीत महिलेलाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.पनवेल पोलिसांनी पीडित महिलेच्या निवेदनाच्या आधारे आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६ आणि३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी लैंगिक अत्याचाची घटना घडली आहे आणि आरोपी डॉक्टर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी डॉक्टरने त्या महिलेला काही त्रास होत आहे का ? असे विचारले. त्यावेळी महिलेने सांगितले की, शरीर दुखत आहे. यावर आरोपी डॉक्टर म्हणाला की मालिश करावी लागेल. त्यानंतर आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित महिला आणि आरोपी दोघेही कोविड-१९ संक्रमित आहेत. दोघांवर क्वारंटाईन केंद्रावर उपचार सुरु आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर कोरोना संसर्गाचा बळी आहे. या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलिसांनी सांगितले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार म्हणाले, आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची कोविड-१९ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 
Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget