ठाणे महापालिकेकडून करवसुलीमध्ये १० टक्के सूट

ठाणे - लॉकडाऊनमुळे साडेतीन महिन्यांपासून ठाणे महापालिकेचे उत्त्पन्न पूर्णतः बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचण सोडविण्यासाठी महापालिकेने मालमत्ता करावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी आता ठाणेकरांना मालमत्ता करात सवलत देण्याची योजना पालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, मालमत्ता कर एकत्रित भरणाऱ्या मालमत्ताधारकांना दुसऱ्या सहामाहीत १० टक्के सवलत देण्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
जे करदाते सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर एकत्र भरतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या करामध्ये १० टक्के सूट देण्यात येणार असून या योजनेचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर, अशी संपूर्ण रक्कम भरतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये (अग्निशमन कर वगळता) सूट देण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या संपूर्ण वर्षातील मालमत्ता कर १५ सप्टेंबरपर्यत भरल्यास १० टक्के सूट देण्यात येणार आहे. तर १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत भरल्यास ४ टक्के, १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भरल्यास ३ टक्के तर १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत भरल्यास २ टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर प्राधान्याने भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.सध्या सुरू असलेला कोविड-19 चा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे बिले प्रत्यक्ष वितरित करण्यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. ही अडचण विचारात घेता करदात्यांनी महापालिकेच्या ई-सुविधेद्वारे मालमत्ता कर भरावा, असे आवाहन देखील पालिकेद्वारे करण्यात आले आहे. महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget