देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ७२० कोरोनाचे नवे रुग्ण

नवी दिल्ली - देशात कोरोनाने अक्षरशः तांडव घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुगणांच्या संख्येत वाढच होत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने १२ लाखांचा टप्पा पार केला आहे.तर गेल्या २४ तासांत उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल ४५ हजार ७२० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ लाख ३८ हजार ६३५ वर पोहचली आहे. तर यामध्ये ४ लाख २६ हजार १६७ सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल ७ लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २९ हजार ८६१ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.देशातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात आतापर्यंत १२ हजार ५५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर गेली आहे. यातील एकूण १ लाख ३७ हजार २८२ केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर १ लाख ८७ हजार ७६९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण १ लाख २६ हजार ३२३ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ३ हजार ७१९ जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात ५१ हजार ३९९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २ हजार २२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये १ लाख ८६ हजार ४९२ कोरोनाबाधित तर ३ हजार १४४ जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये १ हजार २६३, पश्चिम बंगालमध्ये १ हजार २२१ तर कर्नाटकमध्ये १ हजार ५१९ जणांचा बळी गेला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget