जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शाहिद, २ गंभीर

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य २ जवान गंभीर जखमी झाले आहेत.जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवादी हल्लासोपोरामधील मॉडेल टाऊनमध्ये हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी हा परिसर सील केला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. तर हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गस्त घालणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी स्थानिकांनाही निशाणा बनवण्यास सुरुवात केली.
'एएनआय'वर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओसोबतच एक फोटोही बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा मुलगा त्याच्या वडिलांच्या मृतदेहावर खेळताना दिसला होता. हा फोटो घटनास्थळावरीलच असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एका जवानाने या मुलाला सुरक्षित स्थळी नेल्याचा फोटोही व्हायरल झाला.गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील महिन्याभरामध्ये सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास ३० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळं दहशतवाद्यांनी आता स्थानिकांना निशाण्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget