दूध दरवाढ आंदोलन पेटले ; स्वाभिमानीने फोडला दुधाचा टँकर

सांगली - दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली असून ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता पहायला मिळत असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला असून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे. नगरच्या अकोले तालुक्यातील अनेक गावात आंदोलन केले जात असून दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. तर नाशिकमधील चिंचखेड गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलनास सुरुवात केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget