कोरोनामुळे जुन्ररमधील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन

जुन्नर - पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय ५८) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक लढवय्या नेता कोरोनाच्या लढाईत अपयशी झाल्याची हळहळ जुन्नरमध्ये व्यक्त होत आहे.
नगरसेवक दिनेश दुबे हे राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते होते. जुन्नरमध्ये अनेक कामात त्यांचा सहभाग होता. मागील महिन्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दिनेश दुबे आंदोलनात सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात त्यांनी काम केले होते.दिनेश दुबे यांनी नगरपरिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget