मुंबईकरांना प्रत्येकी १० हजारांची मदत करण्याची भाजपने केली मागणी

मुंबई -मुंबईमध्ये एका दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या नालेसफाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.मुंबईमध्ये ११३ टक्के नालेसफाई झाली का हातसफाई झाली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करायला हवी तशी झालेली नाही, त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये महापालिकेने या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
दुसरीकडे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजपाने राज्य सरकारकडे केली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget